वर्धा. अल्लीपूर पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या वर्धा नदीच्या वारापोटी घाटावर रेतीतस्कारांनी आपला डेराच टाकला आहे. असे पोलिसांनी केलेल्या धडक कावाईत पुढे आले आहे. संबंधित ठिकाणी पोलिसांनी सोमवारी (दि. 5) धाड टाकून रेतीचोरीचे 3 ट्रॅक्टर जप्त केले. शिवाय 6 भुरट्या रेती चोरट्यांविरूद्ध अल्लीपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तुषार खुनकर (रा. सोनेगाव खुनकर), किरण हिरामन आडे (रा. सोनेगाव खुनकर), त्र्यंबक ससाने (रा. मोझरी), शंकर येरमे (रा. मोझरी), बंडू गजानन उमाटे (रा. वरूड), सौरभ वाल्मिक उईके (रा. वरूड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वर्धा नदीच्या वारापोटी घाटात मनमर्जीने रेतीचा उपसा करून झुडपी जंगल व पांदण रस्त्यांचा वापर करीत आहे. रेतीचोरटे चढ्या दराने वाळूची विक्री करण्यासाठी तस्करी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर अपर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांच्या सूचनेवरून सहाय्यक पोलिस अधीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वातील चमूमधील पोलिस उपनिरीक्षक सुधीर बनकर, संदीप बोरबन, रामदास दराडे यांनी वर्धा नदीचे पात्र गाठले. बारकाईने पाहणी केली असता अवैध उत्खनन करून रेतीची चोरटी वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी 3 ट्रॅक्टर व रेती असा एकूण 22 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
Breaking
- मनपा प्रशासन व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा !
- रामटेक तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढ़ावा बैठक संपन्न !
- श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचितला साथ द्या-डॉ.नीरज वाघमारे
- रिकाम्या प्लॉटवर पाणी न साचण्यासाठी त्वरीत भरणा भरावा ; बहादूरा नगर पंचायतीने दिला अल्टीमेटम !
- नारा पार्क च्या उपोषणस्थळी रामटेकचे खासदार श्याम कुमार बर्वे व अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांची संयुक्त भेट
- दीक्षाभूमीवर अनुयायांची गैरसोय टाळावी – डॉ. नितीन राऊत
- दीक्षाभूमीवर अनुयायांची गैरसोय टाळावी – डॉ. नितीन राऊत
- बाबा ताजुद्दीन के सालाना उर्स की तैयारी को लेकर प्रशासन की समीक्षा बैठक ।
- बल्लारपूर शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य !
- बल्लारपूर शहर काँग्रेस अध्यक्ष पदी ‘पापा उर्फ देवेंद्र आर्य’ यांची निवड !
- निर्मल नगरीच्या गजानन मंदिरात 31 वे सामूहिक पारायण संपन्न
- बल्लारपूरमध्ये AAP ची ‘विजय संकल्प सभा’ निवडणुकीच्या रणशिंगाला सुरुवात!
- छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणा देणारा -शितल मालते (पोनि)
- तिच्या संघर्षावर मात करण्यासाठी पालकमंत्री बावनकुळे जेव्हा पालकत्व स्वीकारतात
- वारापोटी घाटावर तस्करांचे साम्राज्य पोलिसांच्या कारवाईत उलगडले वास्तव
- राष्ट्रपतींची खटला चालवण्यास परवानगी
- न्यायमूर्ती वर्माना हटवण्याची प्रक्रिया सुरू
- कंदहारचा खलनायक रौफला धाडले यमलोकी
- 15 लष्करी तळांवर पाकने डागली क्षेपणास्त्रे
- चंदिगडमध्ये हवाई हल्ल्याची वॉर्निंग, सायरन वाजले
- वर्धा जिल्हयात प्रथमच होणार “देवा भाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा ”
- चंद्रपूर शहरातील रेल्वे अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी सकारात्मक पावले
- आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे सुटला १५ गावांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न
वारापोटी घाटावर तस्करांचे साम्राज्य पोलिसांच्या कारवाईत उलगडले वास्तव
RELATED ARTICLES
Recent News
Most Popular


