Saturday, April 18, 2026
Breaking

नारा पार्क च्या उपोषणस्थळी रामटेकचे खासदार श्याम कुमार बर्वे व अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांची संयुक्त भेट

दोन्ही खासदार नारा पार्कचा मुद्दा लोकसभेत उठवणार

समितीचे अध्यक्ष चंदू पाटील यांना दोन्ही खासदारांचे समर्थन

साखळी उपोषणाला 292 दिवस पूर्ण ! जोपर्यंत भूमिपूजन होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील ! चंदू पाटील

नागपूर : दिनांक २१ जुलै

नागपुर सुधार प्रन्यास द्वारा नगर रचना विभागाच्या शहर सिमांकंन समिती द्वारे १९९६ साली रचनाकिंत झालेल्या परंतु आज तागायत पार्क निर्माण न झालेल्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क झाले पाहिजे ? यासाठी समितीद्वारे गेल्या २९२ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला खासदार श्यामकुमार बर्वे व अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी भेट दिली. उपोषण स्थळी भेट प्रसंगी समिती अध्यक्ष चंदू पाटील यांनी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क निर्माण होणं गरजेचं आहे कारण दिक्षा भूमी स्थळी लाखो लोक भेट देतात परंतु दिक्षा भूमी येथे पुरेस्या सुविधा नाहीत, परिणामी समाज बांधवांना व पर्यटकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो तेव्हा समाज बांधवांना या समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी नियोजित पार्क होने अत्यंत गरजेचं आहे, तसेच या ठिकाणी अंतरराष्ट्रीय दर्जाचं संशोधन केंद्र, बुद्धीष्ट विद्यापीठ, विधी विद्यापीठ या पार्क मध्ये निर्माण करुन येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा मिळेल व राष्ट्र निर्माण करीता यांचे योगदान होईल, याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क निर्माण झाला पाहिजे यावर‌ सविस्तर चर्चा केली असता तसेच याकरिता सन्मानीय न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही माहिती देऊन आपण सदर पार्क निर्माण करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करुन संसदीय पातळीवर प्रयत्न करावे. अशी साद घातली, प्रसंगी खासदार बळवंत वानखेडे यांनी मी माझ्या परीने सदर पार्क निर्माण होणे करीता संसदीय स्तरावर प्रयत्न करेल असे आश्वासन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क समितीचे अध्यक्ष चंदू पाटील व समिती सदस्यांना यांना दिले.

यावेळी समितीचे सल्लागार एड.शैलेश नारनवरे तसेच समितीचे गजानन जांगडे राजेश पाटील, अजय खोब्रागडे, रवी चव्हाण, शंकर सोमकुवर, डॉक्टर मोरे, अशोक बोदांडे, आनंद रक्षित, आनंद वाघमारे, डॉक्टर इंगळे, नरेश खडसे, राजकुमार मेश्राम, योगेश शेंडे, विद्याधर बागडे, अरविंद बागडे आणि गौतम पाटील, बोनी वालदे, राजू निमसरकर, नंदु माटे, हेंमत वाहणे आणि जितेंद्र मोटघरे यावेळी उपस्थित होते. महिलांमध्ये यमुना रामटेके, रेखा खोब्रागडे, शशिकला चालखुरे, विजया पाटील, वनिता वालदे, अलका रक्षित जिजा रामटेके भारती वानखेडे, सुषमा कांबळे वंदना सहारे, चंदा वाघमारे, सुनीता सांगोळे, आशा दहाट, जयश्री सोमकुवर, बेबीताई गजभिये, लिलाबाई साळवे यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
Recent News
Milind P. Naranje
Chief Editor
95954445469595444546
Prashik M. Naranje
Sub Editor
70666884887066688488
Most Popular