Saturday, April 18, 2026
Breaking

बल्लारपूरमध्ये AAP ची ‘विजय संकल्प सभा’ निवडणुकीच्या रणशिंगाला सुरुवात!

🪬बल्लारपूर शहरातील सर्व प्रभागांसह नगराध्यक्ष पदासाठी देणार उमेदवार-AAP ची घोषणा

बल्लारपूर,२१ जून २०२५

नगरपरिषदेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशी राजकीय हालचाल वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने (AAP) बल्लारपूर शहरात “विजय संकल्प सभेचे” भव्य आयोजन करून निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

या सभेला पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.सभेला संबोधित करताना आपचे शहराध्यक्ष रवि पुप्पलवार म्हणाले की,बल्लारपूरमध्ये आता परिवर्तनाची वेळ आली आहे. काँग्रेस आणि भाजपने एकामागोमाग शहराची लूट केली पण, आता आम आदमी पार्टी प्रामाणिक व पारदर्शक प्रशासन देण्याच्या निर्धाराने जनतेसमोर उभी आहे.त्यांनी दिल्ली व पंजाब मध्ये आप सरकारने केलेल्या जनहिताच्या कार्यांचा दाखला देत सांगितले की,बल्लारपूरमध्ये देखील शिक्षण, आरोग्य, वीज व पाणी या मूलभूत सुविधा सुधारण्यास AAP कटिबद्ध आहे.

पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश्वर गंडलेवार यांनी त्यांच्या भाषणात भ्रष्टाचारमुक्त प्रशासन व स्थानिक विकासावर भर दिला. आप ची सत्ता आल्यास नगरपरिषदेमधील भ्रष्टाचाराला आळा बसवण्यात येईल आणि प्रत्येक नागरिकाला चांगल्या सुविधा पुरवण्यात येतील. बल्लारपूरला आदर्श शहर बनविण्याचा आम्ही संकल्प करतो असेही यावेळी म्हणाले.

या विजय संकल्प सभेमध्ये उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांसाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा संकल्प केला. लवकरच आप कडून उमेदवारांची यादी जाहीर होणार असून, घराघरात जाऊन जनसंपर्क मोहिम राबविण्याची माहिती देण्यात आली.

या सभेच्या यशस्वी आयोजनामुळे हे स्पष्ट झाले आहे की, आम आदमी पार्टी बल्लारपूर नगरपरिषद निवडणुकांमध्ये संपूर्ण ताकदीने उतरणार आहे आणि यंदा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे. ही सभा सध्या शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली असून, AAP एक नव्या घडीची राजकीय लाट घेऊन येणार, अशी शक्यता वर्तविल्या जात आहे.

या वेळी AAP बल्लारपूर शहरातील सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सुत्रसंचालन शहर प्रवक्ते आसिफ शेख यांनी केले.

RELATED ARTICLES
Recent News
Milind P. Naranje
Chief Editor
95954445469595444546
Prashik M. Naranje
Sub Editor
70666884887066688488
Most Popular