
मारेगाव,दि.14 ऑगष्ट 2025 : वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे यांनी पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद यात्रा सुरू केली असून काल दुसऱ्या दिवशी मारेगांव तालुक्यात त्यांचा झंझावाती दौरा संपन्न झाला.या दौऱ्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर सभा झाल्या असून बाळासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोकांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश घेतला. डॉ.नीरज वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, प्रस्थापित आणि मनुवादी पक्षाने बहुजन चळवळीचे अनेक तुकडे केले असून फुले शाहू आंबेडकरी शक्तीचे खच्चीकरण केले आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये केवळ बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी हाच पक्ष वंचितांचा सत्तेकडे नेणारा मार्ग प्रशस्त करू शकतो. म्हणून 42 लाख मतदानाचा टप्पा पार करणारा फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीतला हा एकमेव पक्ष असून बाळासाहेबांच्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवला पाहिजे, जेणेकरून वंचितांना सत्तेत भागीदारी मिळेल. डॉ.नीरज वाघमारे यांच्या संबोधनाने प्रभावित होऊन अनेक लोकांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला. मारेगांव तालुक्यातील संपूर्ण दिवसभर झालेल्या भरगच्च सभांमधून जनतेने अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून डॉ.नीरज वाघमारे यांनी वणी व मारेगाव विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त केले. या संवाद दौऱ्यात गावागावातील शेकडो नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेवर विश्वास ठेवून जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश केला.
मारेगांव : १) ज्ञानेश्वर मुन २) सेख सलीम शेख रऊफ ३) निळावती मुन ४) मुज्जू भाई यांचे सह अनेकांचा मारेगावात पक्षप्रवेश.
आकापूर : ५) संजय वानखेडे – सामाजिक कार्यकर्ता ६) सौ.काटकर – उपसरपंच आकापुर ७) धम्मराज भरणे ८) बंडूजी पुनवटकर ९) प्रविणभाऊ काटकर १०) रामनाथ भरणे यांचे सह अनेकांचा आकापुरात पक्षप्रवेश.
लाखापूर : ११) प्रदिप पेंन्दोर – आदिवासी समाज बांधव नेतृत्व,यांचे नेतृत्वात १२) दिपक छापेकर १३) मंगेश चांदेकर यांचे सह असंख्य महिला पुरुष कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश.
चिंचमंडळ : १४) ज्ञानेश्वर देठे १५) सिमा सुरेश कवाडे यांचे सह अनेकांचा पक्षप्रवेश.
मार्डी : १६) यशोधरा लीहीतकर १७) विजय निमसटकर १८) रंजनाताई चंदनखेडे १९) मेधाताई भगत २०) कलावतीबाई कांबळे २१) मंदाबाई निमसटकर २२) धनराज चंदनखेडे यांचे सह असंख्य महिला पुरुष कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश.
देवाळा : २३) करमनकर साहेब २४) मेघराज बेसेकर २५) सुबोध हस्ते २६) भोंगाडे ताई २७) मिराबाई करमनकर २८) निर्माणबाई अवथरे यांचे सह असंख्य युवक,महिला, पुरुष कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश.
सिंदी : २९) मनोज भगत ३०) चिमनराव नरांजे ३१) प्रतिक्षा भगत ३२) रोहीत भगत ३३) विनोद भगत ३४) धिरज नरांजे यांचे सह असंख्य युवक,महिला, पुरुष कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश.
मारेगाव येथील साई मंदिर: ३५) गजानन चंदनखेडे – साई समिती सचिव यांचे नेतृत्वात असंख्य पुरुष महिला सह साई सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश.
बोटोणी : ३६) उमाकांत बारसाकडे ३७) विक्री सुभाष रामटेके ३८) सौ.पुजा प्रमोद भसारकर ३९) सौ. सासष्ठा उमाकात बारसाकडे ४०) सौ.अश्विनी विक्री रामटेके यांचे सह असंख्य युवक,महिला, पुरुष कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश.
नवरगांव : ४१) गयबिदासजी फुलझेले ४२) मालाबाई फुलझेले ४३) जगदिश रामटेके ४४) प्रतिभा रामटेके ४५) बंडू अवथरे ४६) अशेड डंभारे ४७) विनायक दारुंडे ४८) कुमुद रामटेके ४९) सुकेशिनी दारूंडे ५०) निळावती मुन यांचे सह असंख्य युवक,महिला, पुरुष कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश.
सगणापूर : ४९) सुनील वाघमारे ५०) मुरलीधर जिवणे
सराटी : ५१) सिद्धार्थ बहादे ५२) प्रशिक वानखेडे ५३) शुद्धोधन वनकर
सालेभट्टी : ५४) लीलाधर कोरझरे
कोलगांव : ५५) अभिषा निमसटकर – सरपंच, कोलगांव.५६) धीरज लोखंडे यांचे सह संवाद दौऱ्यात आलेल्या असंख्य युवक, महिला, पुरुष कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश.
या संवाद दौऱ्यात खालील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग घेऊन वणी आणि मारेगांव तालुक्यात दौरा यशस्वी केला. यामध्ये मिलिंद पाटील-जिल्हा महासचिव, राजेंद्र निमसटकर, गौतम दारुंडे-तालुकाध्यक्ष मारेगाव, गजानन चंदनखेडे, संजय जीवने -तालुका उपाध्यक्ष, ज्ञानेश्वर मून, दिलीप पाटील, अनंत खाडे, वासूमित्र वनकर, गोरखनाथ पाटील, अभीषा निमसटकर, निळावती मून, लताबाई वनकर, बालू गजभिये, विजय खाडे, ज्ञानेश्वर धोपटे, गौतम ताकसांडे, धीरज लोखंडे, लीलाधर कोरझरे, राजू पाटील, बंटी बाभळे, अमर खैरे, कैलास खाडे, बाळू टेणपे, रामा पिपराडे, राजकुमार राऊत, शेख सलीम शेख रऊफ, प्रणिता काळे, नंदिनी ठमके व परिसरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.




