Saturday, April 18, 2026
Breaking

रामटेक तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढ़ावा बैठक संपन्न !

नागपूर,दि.19 ऑक्टोंबर 2025 :

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दि.19 ऑक्टोंबर 2025 रोजी दीप होटल रामटेक येथे रामटेक तालुका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी नागपूर जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजाभाऊ टाकसाळे यांच्या अध्यक्षतेत प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर जिल्हा उपाध्यक्ष खेमराज कोंडे, रामटेक तालुका अध्यक्ष मनीष भाऊ खोब्रागडे, महिला पदाधिकारी अलका बघेल, शीला मोहोड, वीणा वंजारी, भारती गजभिये, दीपक सहारे, रवींद्र मेश्राम, मुकेश मेश्राम, प्रेमानंद गजघाटे, आभास कळंबे, अनिकेत कराडे, अमर सहारे, भगवान कावळे, नेहान धमगाये, अतुल गजभिये, हेमंत जगदल, अनिकेत खोटे, भीमा खोब्रागडे यांचेसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

सदर बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकी संबंधी सांगोपांग चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निष्ठावान ,प्रामाणिक गावनिहाय स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांशी समन्वय साधून प्रत्येक वार्डातील मतदार ,नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सम्यक तत्वप्रणाली, विचारधारा घराघरापर्यंत पोहोचविण्याचा कृती संकल्प करावा असे आवाहन नागपूर ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष डॉ.राजाभाऊ टाकसाळे यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सरसेनापती तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पदाधिकारी व सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा मान सन्मान केला जातो त्यामुळे कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा लावून पक्ष कार्यकरावे आणि शेतकरी, शेतमजूर,भूमिहीन,बेरोजगार , कामगार, गोर गरीब,शोषित पीडित नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन समाजकार्य करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सरसेनापती तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करून येणाऱ्या स्वायत्त संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा कृती संकल्प करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन नागपूर ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे यांनी केले.या आढावा
बैठक कार्यक्रमास रामटेक तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Recent News
Milind P. Naranje
Chief Editor
95954445469595444546
Prashik M. Naranje
Sub Editor
70666884887066688488
Most Popular