Saturday, April 18, 2026
Breaking

वारापोटी घाटावर तस्करांचे साम्राज्य पोलिसांच्या कारवाईत उलगडले वास्तव

वर्धा. अल्लीपूर पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या वर्धा नदीच्या वारापोटी घाटावर रेतीतस्कारांनी आपला डेराच टाकला आहे. असे पोलिसांनी केलेल्या धडक कावाईत पुढे आले आहे. संबंधित ठिकाणी पोलिसांनी सोमवारी (दि. 5) धाड टाकून रेतीचोरीचे 3 ट्रॅक्टर जप्त केले. शिवाय 6 भुरट्या रेती चोरट्यांविरूद्ध अल्लीपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तुषार खुनकर (रा. सोनेगाव खुनकर), किरण हिरामन आडे (रा. सोनेगाव खुनकर), त्र्यंबक ससाने (रा. मोझरी), शंकर येरमे (रा. मोझरी), बंडू गजानन उमाटे (रा. वरूड), सौरभ वाल्मिक उईके (रा. वरूड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वर्धा नदीच्या वारापोटी घाटात मनमर्जीने रेतीचा उपसा करून झुडपी जंगल व पांदण रस्त्यांचा वापर करीत आहे. रेतीचोरटे चढ्या दराने वाळूची विक्री करण्यासाठी तस्करी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर अपर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांच्या सूचनेवरून सहाय्यक पोलिस अधीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वातील चमूमधील पोलिस उपनिरीक्षक सुधीर बनकर, संदीप बोरबन, रामदास दराडे यांनी वर्धा नदीचे पात्र गाठले. बारकाईने पाहणी केली असता अवैध उत्खनन करून रेतीची चोरटी वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी 3 ट्रॅक्टर व रेती असा एकूण 22 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

RELATED ARTICLES
Recent News
Milind P. Naranje
Chief Editor
95954445469595444546
Prashik M. Naranje
Sub Editor
70666884887066688488
Most Popular